शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

By admin | Updated: October 22, 2015 21:08 IST

जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. एक नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, बुधवारी नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला

 

बीड : जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. एक नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, बुधवारी नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला. वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ठिकाणी उमेदवारांसह पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गल्लीबोळात प्रचार सभा वडवणी : शहरातील पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी माजली असून दोन दिवसांत खासदार, आमदार, माजी मंत्नी, विरोधी पक्षनेते यांच्यासह इतर अनेक पक्षश्रेष्ठी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. नगरपंचायत निवडणुकीत १000५ मतदार असून १७ जागेसाठी ७0 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. शहरातून प्रचार करताना मुख्य रस्त्यांवरील धूळ मोठय़ा प्रमाणावर उडत असून काही पदाधिकारी गाडीतूनच प्रचार करण्यास ध्यनता मानतात. शहरातील मुख्य प्रश्न मतदार उपस्थित करत आहेत. यावर उमेदवारांकडून दुष्काळातही आश्‍वासनांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. बुधवारी सकाळपासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे पक्षाच्या उमेदवाराने प्रभागातील डोअर टू डोअर प्रचार केला. शहरातील जोडअंबातांडा, मुस्लिम मोहल्ला, वडरवाडा, बसस्थानक परिसरात भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी कॉर्नर बैठक घेऊन प्रचारात युवाशक्ती सक्रिय सहभाग नोंदविला. १७ जागांसाठी ६0 उमेदवार शिरूर कासार : नगरपंचायतीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर १७ जागांसाठी ६0 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही वार्डात सरळ तर काही वार्डात तीन, चार आणि दोन वार्डात प्रत्येकी ७ उमेदवार उभे राहिल्याने निवडणुकीला चांगलाच रंग येत आहे. पक्षीय उमेदवारांबरोबर अपक्षांचाही मोठा वाटा असल्याने अपक्षामुळे कोणाचा तोटा होणार, कोणाचा फायदा हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजप १७, राष्ट्रवादी १७, शिवसेना ११, राष्ट्रीय काँग्रेस २ याशिवाय १३ अपक्षांनी कंबर कसली आहे. पक्षीय नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्याने आत कोण कोणाला भारी पडेल हे मतदार दाखवून देणार आहेत. वार्ड क्रमांक तीनमध्ये नात्यागोत्यामधील उमेदवार समोरासमोर आहेत. यामध्ये नात्याने सासू सूना असलेल्या व मागील ग्रा. पं. निवडणुकीत सुनेला मागे टाकत सासूने उपसरपंचपद भूषविले होत. आता कोण हे मतदार ठरवणार आहेत. ग्रा. पं. चे सरपंच राहिलेल्या पुन्हा एक नंबर वार्डमधून नगरपंचायतसाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या उमेदवाराचे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारांना बळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रचारसभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आईचा जागर संपताच आता खुर्चीसाठी गोंधळ व त्याचा संबळ वाजणार आहे. एका वार्डात फेरबदल झाल्याने पक्षीय अधिकृत फॉर्म दिल्यानंतर आपापसात तडजोड करून भाजपाच्या उमेदवारात फेरबदल होऊन काकाच्या जागेवर पुतण्या निवडणूक लढवत आहे.