शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भाषिक व सांस्कृतिक धोरणात शिक्षणाला समाविष्ट करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:10 IST

शिक्षणाकडे शासनाने स्वत:ची जबाबदारी समजून भाषिक व सांस्कृतिक धोरण ठरविताना त्यात शिक्षणाला समाविष्ट करावे. शिक्षण ही लोकचळवळ बनविण्याची गरज माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘ग्रामीण शिक्षण समस्या आणि उपाय’ विषयावरील परिसंवादात जनार्दन वाघमारे यांचे मत

मल्हारीकांत देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शिक्षणाकडे शासनाने स्वत:ची जबाबदारी समजून भाषिक व सांस्कृतिक धोरण ठरविताना त्यात शिक्षणाला समाविष्ट करावे. शिक्षण ही लोकचळवळ बनविण्याची गरज माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केली. स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात ‘ग्रामीण शिक्षण समस्या आणि उपाय’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आपल्या भाषणात डॉ. वाघमारे म्हणाले, आजचे शिक्षण हे चौरस्त्यावर उभे आहे. त्याला योग्य दिशा राहिली नाही. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेचा पुढे विचारच झाला नाही. शिक्षणाची आणि कृषी संस्कृतीची नाळ कधीच जुळली नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे प्रश्न निर्माण होत आहे. आज या संकटात सापडलेल्या कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय? खरे तर शासनाने निवासी शाळा उघडाव्यात. मुख्याध्यापक, पालक, गावकरी, प्रशासन व शिक्षक या पंचसूत्रीतून शाळेचा विकास व्हावा. इंग्रजी शाळेतून कुणाचेही करिअर बनणार नाही. सगळी बुद्धिमत्ता भाषा शिकण्यात खर्च होते. त्यामुळे आठवीपर्यंत सरसकट शिक्षण मराठीतून व्हावे, असेही ते म्हणाले.

या परिसंवादात प्रारंभी निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण शिक्षणातील समस्या व त्या दूर करण्यासाठी शासकीय स्तरावरून होत असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी माहिती दिली. साहित्यिक पत्रकार अमर हबीब यांनी मात्र आपल्या भाषणात शिक्षण व्यवस्थेसह शिक्षकांवर सडेतोड टीका केली. शिक्षकांनी पगारापुरते तरी काम करावे, असा त्यांचा एकूणच सूर होता.शिक्षणातील दांभिकतेवर बोलताना ते म्हणाले, राजकारणी लोक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवतात आणि गोरगरिबांच्या पदरी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यांची मुले या शाळेत का शिकू नये व राजकारणी लोक गरिबांना गरिबीतच ठेवू इच्छितात. शेतकºयांची क्रयशक्ती मात्र मारली जात आहे. खरे तर या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वातंत्र्य देऊन त्यांंना टोकण देण्यात यावे. त्यांंना हवे तिथे शिक्षण घेता यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शेतकºयांची परिस्थिती सुधारली तरच शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

अमीर हबीब यांच्या भाषणाचा धागा पकडत योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तीच अवस्था आहे. हंटर कमिशनपुढे म. फुले यांनी केलेल्या मागण्या आजही पूर्ण झाल्या नाहीत. शैक्षणिक संस्थांकडे यंत्रणेची वक्रदृष्टी आहे. शिक्षकांच्या सुट्या कमी केल्या पाहिजेत. त्यांची अशैक्षणिक कामे काढून घेतली जावीत. नोकरीतील सुरक्षितता संपवावी. इंग्रजी माध्यमाबाबत पालकांचे उद्बोधन करावे. गळती थांबवण्यासाठी मार्कांचा फुगवटा ही अतिशय मारक गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी मातृभाषेची नाळ जोडून समाज व्यवस्था सुधारणेची गरज यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.या परिसंवादासाठी डॉ. पुरुषोत्तम भापकर व संचालक नंदकुमार वर्मा हे उपस्थित राहू शकले नसल्याने उपस्थित शिक्षकांचा हिरमोडझाला.शिक्षणात सर्वाधिक विषमतानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी मात्र शिक्षकांची बाजू उचलून धरली. शिक्षकांचा सन्मान केला तरच शिक्षण व्यवस्थेत बदल होऊ शकतो. शिक्षणात सर्वाधिक विषमता निर्माण झाली आहे. फाईव्ह स्टार शाळा निघणार आहेत. जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची शासनाची मानसिकता बनली आहे. गाव तिथे शाळा, शाळा तिथे ग्रंथालय या घोषणा आज संपुष्टात आल्या आहेत. मातृभाषा आणि संस्कृतीचा संबंध तुटत चालला आहे. अजून काही वर्षांनी आज सारखी मराठी साहित्य संमेलने होतील की नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षणाचा विचार सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक संदर्भात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन