शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पेरणीदरम्यान शेतकऱ्यांनी चतु:सूत्रीचा अवलंब करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. यावर्षी देखील विक्रमी पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान सोयाबीन पेरणी करत असताना चतु:सूत्रीची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सोयाबीन पेरणी करण्यासाठी शक्यतो शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे तसेच सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, पेरणी करताना बी.बी.एफ म्हणजे रुंद सरी वरंबा या पद्धतीने पेरणी करावी जेणेकरून उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल, या चतु:सूत्रीचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यासंदर्भात बीड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व गावांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे.

सोयाबीन लगावडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणीकरिता कृषी सहाय्यकामार्फत विविध गावांमध्ये उगवणक्षमता तपासणी पीक प्रात्यक्षिके घेण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. उगवण क्षमता तपासणी जर ७० टक्के येत असेल तर ७५ किलो प्रति हेक्टर सोयाबीन बियाणांचा वापर करावा. जर उगवण क्षमता कमी असेल तर प्रति एक टक्के याला अर्धा किलो बियाणे अशा प्रमाणात बियाणे वाढवावे. जर उगवण क्षमता ६० टक्के पेक्षा कमी असेल तर अशा पद्धतीच बियाणे शक्यतो वापरू नये. त्याचबरोबर बियाणास जिवाणूसंवर्धक व तसेच रासायनिक कीटकनाशक याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जेणेकरून पेरणी झाल्यानंतर असे पीक कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडते. जिवाणूसंवर्धकामुळे पिकाची जोमदार वाढ होते. लागवड करताना रुंद सरी, वरंबा पद्धतीने लागवड करावी. जेणेकरून पिकाची वाढही चांगल्या पद्धतीने होते. जास्तीत जास्त ओलावा पिकाच्या मुळांमध्ये धरुन ठेवला जातो. याचा फायदा उत्पन्न वाढीमध्ये होतो. चतु:सूत्रीचा वापर करून सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सोयाबीन पेरणी करत असताना शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरावे, तसाच वरील चतुसूत्रीचा अवलंब करून, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करावे. या कामासाठी गावातील संबंधित कृषी सहाय्याकाची मदत शेतकऱ्यांनी घ्यावे. तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

-बी.आर गंडे, तालुका कृषी अधिकारी, बीड.

===Photopath===

280421\034728_2_bed_9_28042021_14.jpg

===Caption===

सोयाबीन