नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस पडत आहे की पाण्यामुळे लोक बेहाल झाले आहेत. त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके जळून जाण्याची वेळ येत आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश होऊन बेहाल झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन व मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचा शेतातील माल शेतातच राहिला. त्याला मार्केटमध्ये नेता आला नाही आले. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. झालेले नुकसान हाताशी होता पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आतातरी गेल्या वर्षी झालेले नुकसान भरपाई काढू या आशेवर शेतकरी होता. पण आज चक्क पावसानेच पाठ फिरवली. गेल्या पंधरा दिवसांपासून नेकनूर व परिसरात पाऊस नसल्याने पीके कोमेजून गेली आहेत.
अजून पाच-सहा दिवस पाऊस नाही आला तर आलेली पिके पण जळून जातील की काय याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाऊस नसल्याने नद्या, तलाव, बंधारे, विहिरी अजुन कोरडे ठणठणीत.
बीड जिल्यातील नेकनुर परिसरात अजुन पिकांना पुरेल येवढं पण पाऊस पडला नाही. अजुन,नद्या,तलाव,विहारी अजुन कोरड्या आहे
पाऊस पडत नसल्याने नेकनूर भागात खूप कमी प्रमाणत पाऊस पडला असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. अजून ५,६ दिवस पाऊस नाही पडला तर पिके करपून जातील. अजुन एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
अरविंद जाधव(सामाजिक कार्यकर्ते)