शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नेकनूर परिसरात पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

विशाल शिंदे नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस ...

विशाल शिंदे

नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस पडत आहे की पाण्यामुळे लोक बेहाल झाले आहेत. त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे ; पण बीड जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश होऊन बेहाल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन व मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचा शेतातील माल शेतातच राहिला. त्याला मार्केटमध्ये नेता आला नाही आले. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. नुकसान झालेले असतानाही पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता तरी गेल्या वर्षी झालेले नुकसान भरून काढू या आशेवर शेतकरी होता ; पण आज चक्क पावसाने पाठ फिरवली. गेल्या पंधरा दिवसांपासून नेकनूर व परिसरात पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेली आहेत.

अजून पाच-सहा दिवस पाऊस नाही आला तर आलेली पिकेही जळून जातील की काय, याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाऊस नसल्याने नद्या, तलाव, बंधारे, विहिरी अजून कोरडे ठणठणीत.

बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात अजून पिकांना पुरेल इतका पाऊस पडला नाही. नद्या, तलाव, विहारी अजूनही कोरड्या आहेत.

पाऊस पडत नसल्याने नेकनूर भागात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. अजून ५, ६ दिवस पाऊस नाही पडला तर पिके करपून जातील. अजून एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-अरविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते.