शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नेकनूर परिसरात पाऊस नसल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST

विशाल शिंदे नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस ...

विशाल शिंदे

नेकनूर : पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये पडत असलेल्या महाभयंकर पावसामुळे नद्यांना मोठे पूर येत आहेत. एवढा पाऊस पडत आहे की पाण्यामुळे लोक बेहाल झाले आहेत. त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे; पण बीड जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

पाऊस पडत नसल्याने शेतकरी हताश होऊन बेहाल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन व मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचा शेतातील माल शेतातच राहिला. त्याला मार्केटमध्ये नेता आला नाही आले. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. नुकसान झालेले असतानाही पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता तरी गेल्या वर्षी झालेले नुकसान भरून काढू या आशेवर शेतकरी होता; पण आज चक्क पावसानेच पाठ फिरवली. गेल्या पंधरा दिवसांपासून नेकनूर व परिसरात पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेली आहेत.

अजून पाच-सहा दिवस पाऊस नाही आला तर आलेली पिकेही जळून जातील की काय, याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाऊस नसल्याने नद्या, तलाव, बंधारे, विहिरी अजून कोरडे ठणठणीत.

बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात अजून पिकांना पुरेल इतका पाऊस पडला नाही. नद्या, तलाव, विहारी अजूनही कोरड्या आहेत.

पाऊस पडत नसल्याने नेकनूर भागात खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. अजून ५, ६ दिवस पाऊस नाही पडला तर पिके करपून जातील. अजून एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-अरविंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते.