शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:19 IST

रुग्णालयाजवळ येताच रिक्षात प्रसूत झालेल्या मातेला आणि बाळाला तातडीने अत्यावश्यक सेवा देण्यात आली

ठळक मुद्देरुग्णालयाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने रिक्षात जोराचा दणका बसला.रुग्णालयाच्या दाराजवळ रिक्षा पोहोचत असतानाच महिलेने पुत्ररत्नाला जन्म दिला.

धारूर (जि. बीड) :  येथील ग्रामीण  रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिक्षातच प्रसूती होण्याची वेळ एका मातेवर आली. बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली.

येथील कजबा विभागातील शहाजी उमाप यांची कन्या शारदा घनश्याम मस्के हिला प्रसूतीसाठी एका रिक्षातून  ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने रिक्षात जोराचा दणका बसला. त्यामुळे रुग्णालयाच्या दाराजवळ रिक्षा पोहोचत असतानाच महिलेने पुत्ररत्नाला जन्म दिला. ही बाब समजताच वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी रिक्षाकडे धाव घेत माता आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले.ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे. मोठे वाहन सोडा दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत. दुचाकी चालवताना दगड उडून लागतात तर पाणी अंगावर उडते.  खराब रस्त्यामुळे ही वेळ आल्याचे सांगून हा रस्ता तात्काळ दुरुस्तीची मागणी महिलेचा भाऊ सुधीर उमाप याने केली आहे. 

रुग्णालयाजवळ येताच रिक्षात प्रसूत झालेल्या मातेला आणि बाळाला तातडीने रुग्णालयात नेऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा दिली. दोघांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक चेतन आदमाने यांनी संगितले.  दरम्यान, या रस्त्याची तातडीने दुरुस्तीे करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाBeedबीड