शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांच्या मनमानीमुळे जय महेशचा उतारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:17 IST

पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या वर्षीचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाही कारखानदार मात्र बाहेरच्या क्षेत्रातील ऊस आणत असल्याने तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अद्यापही फडातच उभा आहे. जय महेश कारखान्याने आतापर्यंत बाहेरच्या क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आणल्याने क्षेत्रातील ऊस उभा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उशीर होत असल्याने ऊस ऊत्पादक शेतकरी कारखानदाराच्या दारात चकरा मारत असून तोड देण्याची मागणी करीत आहेत.

शेतक-यांच्या या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी जय महेश कारखान्याचे कर्मचारी पुढे सरसावले आहेत. या संधीचा फायदा घेत अडचणीत सापडलेल्या शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. जो शेतकरी कर्मचाºयांना पैसे देईल त्याचा जूनमध्ये लावलेला अडसाली उसाची तोड करण्यात येत आहे. ८ महिन्याचा ऊस गाळपासाठी येत असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी शेवटच्या टप्प्यात वाढण्याऐवजी घटायला सुरुवात झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी कारखान्याची रिकव्हरी ११.३० एवढी होती. आर्थिक तडजोडीतून आठ महिन्याचा ऊस गाळपास आणत असल्याने साखर उतारा कमालीचा घटला आहे. सध्या उतारा १०.४० टक्क्यांपर्यंत आला आहे.

यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जय महेश कारखान्याच्या कर्मचा-यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.

शेतक-याला भाव न मिळू देण्यासाठी डावशासनाच्या नियमाप्रमाणे शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे भाव देण्याचा नियम आहे. या नियमाप्रमाणे साडेनऊ टक्के पर्यंतच्या रिकव्हरी येणे बंधनकारक आहे. यापुढे जशी रिकव्हरी वाढेल तसा उसाचा भावही वाढवून द्यावा लागतो. रिकव्हरी वाढली तर जास्त पैसे द्यावे लागतील यामुळे कारखान्याच्या उपाध्यक्षाकडून जाणीवपूर्वक रिकव्हरी कमी आणत असल्याचे कारखान्याच्या कर्मचाºयाकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.