शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत ...

ठळक मुद्देदोन वेळा काम बंद; नोटिसीचा परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत जिल्ह्यात ६०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, समान काम समान वेतन द्यावे तसेच अनुभवाच्या आधारे प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी या कर्मचाºयांचा लढा सुरु आहे. ११ एप्रिलपासून ६०० कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले. जिल्हा परिषदेसमोर सलग १२ दिवस त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर आरोग्य संचालकांनी दहा दिवसांचा अवधी मागून बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या कालावधीत शासनाकडून बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे मागण्यांबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी ८ मेपासून या कर्मचा-यांनी पुन्हा काम बंद पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.१६ मेपर्यंत सुरु राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य संघटनेने पुकारलेल्या लॉँगमार्चसाठी ६०० कर्मचारी नाशिककडे रवाना झाले आहेत. १८ मेपासून नाशिक ते मुंबई लॉँगमार्च काढण्यात येणार आहे. २८ मेपर्यंत लॉँगमार्च मुंबईत पोहचणार असल्याचे कर्मचारी नेते आर. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.कर्मचाºयांचे आंदोलन सुरु असल्याने आरोग्य सेवेवर होणा-या परिणामामुळे एनआरएचएम समितीचे अध्यक्ष तथा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या कर्मचा-यांना ४८ दिवसांच्या आत कामावर हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु या नोटिसा आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात गर्दीएनआरएचएम कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे आरोग्य सत्र सेवा बंद पडली आहे. ग्रामीण भागात प्रसूती इतर उपचार होत नसल्याने रुग्णांची उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली आहे.

बाल आरोग्य सेवेवरही परिणामजिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या बाळांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) आहे. तेथे नियुक्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील स्थायी कर्मचा-यांना बोलविण्यात आले आहे. मात्र ते प्रशिक्षित नसल्याने ही उपचार सेवा थंडावली आहे.

‘आयुष्यमान भारत’ ला अडथळाभारत सरकारने जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यासाठी ३० मे पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश आहेत. मात्र या कामावर आशांनी बहिष्कार टाकल्यामुळे व कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे ही नोंदणी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही.