शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

पळीभर तेल स्वस्ताईचा लिटरभर वाजतोय ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

अनिल भंडारी बीड : आयात वाढल्याने तसेच आयात शुल्क कमी होणार असल्याने खाद्यतेल स्वस्त होणार असे वृत्त मागील काही ...

अनिल भंडारी

बीड : आयात वाढल्याने तसेच आयात शुल्क कमी होणार असल्याने खाद्यतेल स्वस्त होणार असे वृत्त मागील काही दिवसांत झळकल्यानंतर बाजारात खाद्यतेलांच्या दरात किरकोळ घसरण झाली असली तरी खूप मोठी स्वस्ताई झाल्याचा ढोल सगळीकडे बडविला जात आहे.

दैनंदिन जीवनात खाद्यतेल सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात खाद्यतेलांचे दर तसे स्थिरच होते. मात्र त्यानंतर वाढती मागणी आणि परदेशात घटलेल्या उत्पादनामुळे खाद्यतेलांचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात वाढ झल्यानंतर ऑक्टोबरपासून खाद्यतेल दरवाढीचा आलेख १० महिन्यांपासून वाढताच राहिला. त्यामुळे महागडे तेल खरेदी करून दिवाळीचा सण साजरा करावा लागला. मात्र त्यानंतरही तेलाचे भाव चढतेच राहिले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधांमुळे लग्नसोहळे, सप्ताह, सार्वजनिक कार्यक्रम होत नसल्याने मागणी घटत असतानाही तेलाचे भाव वाढत राहिल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक अचंबित झाले. तेलाच्या भाववाढीचे चटके सामान्यांना बसत असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारी धोरणात बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. मागील आठवड्यापासून आयात वाढल्याने आणि आयात शुल्कात कपात होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यामुळे खाद्यतेल खूप स्वस्त होणार असे स्वप्न दाखविणे सुरू झाले आहे. परंतु बाजाराचा कानोसा घेतला असता गेल्या दहा महिन्यांत दुपटीपर्यंत वाढत जाणाऱ्या तेलाचे भाव सध्या लिटरमागे दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पळीभर स्वस्त झालेले खाद्यतेल लिटरभर स्वस्त झाल्याचा ढोल बडविणे सुरू आहे. घसरलेल्या या किमती कधी वाढतील याचा नेम नाही; त्यामुळे खाद्यतेलाची स्वस्ताई सर्वसामान्यांपासून अद्याप दूरच आहे.

---------------

सोयाबीन १४०

सूर्यफूल १६५

-----------

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

१) पारंपरिक व्यवसायासाठी तसेच घरात खाण्यासाठी आम्ही शेतात करडई, जवस, सूर्यफूलाचे पीक घेत होतो. मात्र काळाच्या ओघात हा व्यवसाय मागे पडत गेला. त्यामुळे मागील १५-२० वर्षांपासून तेलबियांचे उत्पादन घेणे बंद केले. आता पॅकबंद खाद्यतेलाचा वापर करतो.

- रामेश्वर देशमाने, बीड.

------------

२) आमच्याकडे तेलाचे घाणे होते. करडई, सूर्यफूल, शेंगदाण्याचे पीक घेत होतो. तसेच बाहेरहूनही खरेदी करीत होतो. मात्र तेलघाण्याच्या व्यवस्थापनावर वाढता खर्च आणि वाढलेल्या मजुरीमुळे आर्थिक गणित बिघडले. घाणे बंद पडले. आता बाजारातून तेल खरेदी करावे लागत आहे.

- बालाजी पवार, बीड.

---------------

आधीचे दर

पाम -१४५

सोयबीन -१६०

सूर्यफूल - १८५

शेंगदाणा -१८०

करडी -१९८

मोहरी -१२०

तीळ -१५०

-------

सध्याचे दर

पाम -१२५

सोयाबीन -१४०

सूर्यफूल - १६५

शेंगदाणा- १६५

करडी - २०८

मोहरी -१५०

तीळ १९०

---------------

ज्या पटीने वाढले तसे घटले नाही

नोव्हेंबरमध्ये सोयाबीन तेलाचा १५ लिटरचा डबा १६०० रुपयांना होता. तो २५०० रुपयांपर्यंत वाढला; तर सध्या २२५० वर स्थिरावला आहे. सूर्यफूल तेल १८०० रुपयांना डबा होता. तो २६०० पर्यंत झाला व आता २४०० वर थांबला आहे. ज्या पटीने खाद्यतेलाचे भाव वाढले, त्या पटीत मात्र घट झालेली नाही. करडी, मोहरी, तीळ तेलाच्या दरात मात्र वाढ झाल्याचे दिसत आहे.

-----------------

किचन बजेट कोलमडलेलेच

गतवर्षी मार्चमध्ये १४० रुपये किलो असलेले शेंगदाणा तेल मेमध्ये १८५ रुपयांपर्यंत पोहोचले. सूर्यफूल तेलाचे दर ११५ वरून १८५ पर्यंत तेजीत राहिले. १०० रुपये किलोचे सोयाबीन तेल १६० रुपयांवर पोहोचले; तर पामतेल ९५ वरून १४५ रुपये किलोपर्यंत झाले. खाद्यतेलाचा भडका उडाला. गेल्या काही दिवसांत कमी झालेले दर फार कमी नसल्याने व इतर वस्तूंचे दर चढते राहिल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडलेलेच आहे.

---------