शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

डॉक्टरांनो...घाबरू नका, घाबरवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:29 IST

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूबद्दल हाहाकार माजला आहे. परंतु याचा सामना तुमच्या लढ्याने आणि सामान्यांच्या मदतीने करावयाचा आहे. अशा वेळी आपण घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका, अशा दिलासादायक सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना दिल्या.

ठळक मुद्देकोरोना व्हायरससंदर्भात जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षण : बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांना दिलासा, प्रोत्साहन अन् सूचना

बीड : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूबद्दल हाहाकार माजला आहे. परंतु याचा सामना तुमच्या लढ्याने आणि सामान्यांच्या मदतीने करावयाचा आहे. अशा वेळी आपण घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका, अशा दिलासादायक सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना दिल्या. कोरोनासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच शासकीय डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात प्रशिक्षण दिल्यानंतर रेखावार यांनी मार्गदर्शन केले.कोरोना विषाणूने बाधीत असलेल्या रुग्ण कोणाता, संशयीत कोणता, कोणाला विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात दाखल करायचे? रुग्ण कसा ओळखायचा, सामान्यांना कसे मार्गदर्शन करायचे, त्यांना आधार आणि उपचार कसे करायचे? याबाबत आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.अमोल गायकवाड यांनी कोरोनाबद्दलचे समज, गैरसमज डॉक्टरांना समजावून सांगण्यासह काळजी घेण्याबाबत उपाययोजना सुचविल्या. दुर्दैवाने एखादा रुग्ण बाधीत असल्याचे समजताच आपण कशी काळजी घ्यायची, त्याच्यावर कसे आणि काय उपचार करायचे, याबाबत सुचना केल्या.दरम्यान आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनीही प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या लातूर परिमंडळाचे समन्वयक डॉ.अमोल गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य डॉ.आर.बी.पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.पुणे, मुंबईहून आलेल्यांनीही तपासणी करावीपुणे, मुंबईतही कोरोना आजाराने थैमान घातले आहे. सुट्टयांमुळे तर काही लोक भितीने परतत आहेत. परतलेल्या लोकांना काही लक्षणे जाणवताच त्यांनी जवळच्या आरोग्य संस्थेत जावून स्वता:हुन तपासणी करून घ्यावी. किंवा आपल्याला समजले तरी आपण त्यांना (लक्षणे असतील तरच) तपासणीसाठी बोलवावे, अशा सुचनाही राहुल रेखावार यांनी डॉक्टरांना दिल्या.दरम्यान, सुटी व कोरोनाच्या भीतीने मुंबई, पुण्याहून बीडला येणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्या लोकांना लक्षणे जाणवत आहेत त्यांनी घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य संस्थेत जावून तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.जिल्ह्यात ११ ठिकाणी अलगिकरण कक्ष तयारबीडसह प्रत्येक तालुक्यात एक अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले किंवा संशयीत असलेल्या नागरिकांना या कक्षात ठेवण्यात येणार आहे. सर्व जागा निश्चीत झाल्या असून सीएस, डीएचओंनी याचा आढावाही घेतला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या