शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये गर्भाशय काढण्याचा बाजार मांडणाऱ्या डॉक्टरांना ‘इंजेक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:57 IST

बीड : महिलांना विविध आजारांची भिती दाखवून गर्भाशय काढण्याचा बाजार मांडणाºया बीडमधील डॉक्टरांची आता चौकशी केली जाणार आहे. यासाठी ...

ठळक मुद्देचौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत : दुकानदारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले; बीड जिल्ह्यात तीन वर्षांमध्ये ४ हजार ६०५ गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया

बीड : महिलांना विविध आजारांची भिती दाखवून गर्भाशय काढण्याचा बाजार मांडणाºया बीडमधीलडॉक्टरांची आता चौकशी केली जाणार आहे. यासाठी सात सदस्यीय समिती गठित केली असून, बुधवारी आरोग्य विभागाने तसे आदेशही काढले आहेत. बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षात १०१ रुग्णालयांमध्ये तब्बल ४ हजार ६०५ गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आरोग्य सेवेऐवजी दुकानदारी करणा-या डॉक्टरांचे मात्र आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.बीड जिल्ह्यातील डॉक्टरांनी मागील काही वर्षांमध्ये महिलांना विविध आजारांची भिती दाखवित गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केल्या. हे प्रकरण माध्यमांनी समोर आणल्यानंतर याची राज्यभर चर्चा झाली. आरोग्य विभागही खडबडून जागे झाले. तात्काळ बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांकडून शस्त्रक्रियेची माहिती मागविली होती. यामध्ये मागील तीन वर्षात १०१ रुग्णालयांमध्ये तब्बल ४ हजार ६०५ गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. डॉ. थोरात यांनी डॉ. आय. व्ही. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करुन जिल्ह्यातील ‘टॉप १०’ रुग्णालयांची झाडाझडती घेतली होती. याची सर्व माहिती घेऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात आली होती.आतापर्यंत काय झाले या प्रकरणात?हे प्रकरण समोर येताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी चौकशी समिती गठित करुन सर्व अहवाल संकलित केला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी गावागावात जाऊन आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण केले. सर्व रुग्णालयांची माहिती मागवून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांची बैठक घेतली.गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची परवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यासह काही मार्गदर्शक सूचना आणि बंधने घातली. ही सर्व माहिती आरोग्य संचालकांकडे पाठविली.दोन महिन्यात चौकशी पूर्ण होणारया समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये तीन वर्षात झालेल्या शस्त्रक्रियांची तपासणी करणे, तांत्रिक अभ्यास करणे, डॉक्टरांचे उपलब्ध रेकॉर्डसह शस्त्रक्रिया झालेल्या काही महिलांच्या मुलाखती घेणे व त्याची पडताळणी करणे, अनावश्यक शस्त्रक्रिया केल्या आहेत का याचा अभ्यास करणे याची माहिती घेण्यासह या शस्त्रक्रियांवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे सूचना समितीला आदेशात दिल्या आहेत. अवर सचिव उज्वला अ. रणसिंग यांनी हे आदेश काढले आहेत.‘लोकमत’ने टाकला होता या प्रकरणावर प्रकाश१८ जून रोजी गर्भाशय शस्त्रक्रियेचा मुद्दा विधानपरिषद सभागृहात मांडण्यात आला. ‘लोकमत’ने १२ एप्रिल रोजी ‘बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढण्याचा बाजार’, १३ एप्रिल रोजी हा ‘...हा बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा डाव’, १३ एप्रिल रोजी ‘केजच्या त्या रुग्णालयाकडून अहवाल पाठविण्यास दिरंगाई’, १७ एप्रिल रोजी ‘गर्भपिशवी शस्त्रक्रिया: खाजगी रुग्णालयांना बंधने’, तर १८ एप्रिल रोजी ‘१०१ रुग्णालयांत चार हजार गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर