शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर जाहीर केल्याशिवाय गळीत चालू करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे.

ठळक मुद्देकरपे : १७-१८,१८-१९ च्या ऊस गळीत हंगामातील १५ टक्के विलंब व्याज अदा करा

बीड : जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे. अद्याप कोणत्याही साखर कारखान्यांनी आपला ऊस दर निश्चित केला नाही.केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊस दर निश्चित केल्याशिवाय गळीत हंगाम चालू करू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊस वाहतूक रोखून आक्र मक आंदोलन छेडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, रेवकी सर्कल प्रमुख बळीराम शिंदे, पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २१ रोजी लेखी निवेदन देऊन दिला आहे.वास्तविक पाहता ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रु . दर मिळणे आवश्यक असून ते अद्याप मराठवाड्यातील साखर कारखाने देण्यास सर्रास टाळतात. ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ प्रमाणे १४ दिवसांत संबंधित शेतकºयांना ऊसबिल बँक खात्यात जमा करावे लागते.विहित मुदतीत ऊसबिल न दिल्यास सदर कायद्यानुसार थकीत रकमेवर १५ टक्के विलंब व्याज द्यावे लागते. मात्र सदर कायद्याची पायमल्ली होत असल्याने याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदन, आंदोलन करून विनंती केली आहे. मात्र याबाबतीत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने साखर कारखानदारांवर कायद्याचा वचक बसत नाही परिणामी ऊस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रु पयांचे प्रचंड नुकसान होत आहे.हे थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीडचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी २१ रोजी निवेदन देऊन २०१९-२० च्या ऊस गळीत हंगामासाठी बीड जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊसदर निश्चित करूनच आपला गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी केली आहे. तसेच २०१७-१८, १८्-१९ मधील थकीत रकमेचे १५ टक्के विलंब व्याज संबंधित शेतक-यांना तात्काळ अदा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३० नोव्हेंबरनंतर संपूर्ण ऊस वाहतूक रोखून बीड जिल्ह्यात आक्र मक आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने