यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे, नायब तहसीलदार बाळू खेडकर, गटविकास अधिकारी राजेश बागडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी उमेश आडगावकर, तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांच्यासह तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, माजी उपनगराध्यक्ष बाबूराव झिरपे, नगरसेवक भीमराव गायकवाड, नशीर शेख, अमोल चव्हाण, रवी आघाव, सतीश बडे, धर्मा जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी, घरकूल, पीक कर्ज वाटप, वैयक्तिक आणि सार्वजनिक हितांच्या कामांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. पंचायत समितीच्या संदर्भात खूप तक्रारी असून इतर तालुक्यात कामांना मंजुरी मिळून बिलांचे वाटप झालेले असताना याच तालुक्यात काय अडचण आहे, असा सवालदेखील त्यांनी विचारला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असून नियमित आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यापुढे कामात हयगय चालणार नसून कोरोनाची कारणे सांगून नागरिकांना आडवे लावू नका, असे स्पष्टपणे बजावले.
या बैठकीला सुभाष यमपुरे, किशोर जेधे, अक्षय जाधव, दादा सवासे, प्रल्हाद जरांगे, संतोष जरांगे, विष्णू वारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
030721\img-20210702-wa0046.jpg
आढावा बैठक