शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हादरला; २१ कोरोनाबळींसह ११४५ नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST

मृत्यूसत्र व समूहसंसर्ग थांबत नसल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.२१) ४ हजार ६९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, ...

मृत्यूसत्र व समूहसंसर्ग थांबत नसल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.२१) ४ हजार ६९० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार ५४५ जण निगेटिव्ह आले तर एक हजार १४५ जणांचे अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बीडमध्ये सर्वाधिक २२६ आढळून आले, अंबाजोगाई २०५, आष्टी १३८,धारुर ४३,गेवराई ११६,केज ११९,माजलगाव ६५,परळी ७७, पाटोदा ९१, शिरुर ३३, वडवणी ३२ जणांचा समावेश आहे. दिवसभरात ९४७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. एकूण बाधित ४३ हजार ६५० पैकी ३७ हजार ६४६ जणांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान, गुरुवारी मृतांची उच्चांकी नोंद झाली. तब्बल २१ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा ७९२ वर पोहोचला. सध्या ५ हजार २१२ जण उपचार घेत असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी दिली.

आतापर्यंतचा उच्चांक

जिल्ह्यात गुरुवारी २१ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. यात वकीलवाडी (ता.केज) येथील ७४ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय पुरुष बीड, ७० वर्षीय पुरुष चऱ्हाटा (ता.बीड), ४० वर्षीय पुरुष बकरवाडी (ता.बीड), ६५ वर्षीय पुरुष गावंदरा (ता.धारर), ४८ वर्षीय पुरुष नेकनूर (ता.बीड),७२ वर्षीय पुरुष भगवान विद्यालयाजवळ बीड, ६५ वर्षीय महिला एकनाथनगर बीड, ६५ वर्षीय महिला चकलांबा (ताग़ेवराई), ५४ वर्षीय पुरुष विद्यानगर बीड, ६५ वर्षीय पुरुष टाकळी देशमुख (ता.परळी), ७० वर्षीय पुरुष लऊळ (ता.अंबाजोगाई), ५० वर्षीय पुरुष मंगरुळ क्र.२ (ता.माजलगाव), ७५ वर्षीय महिला जिरेवाडी (ता.परळी), २० वर्षीय तरुण नीमगाव (ता.बीड), ७० वर्षीय महिला परळी, ६० वर्षीय महिला गेवराई, ६८ वर्षीय पुरुष गांधीनगर बीड, ५५ वर्षीय महिला जुना बाजार बीड, ५० वर्षीय पुरुष पिंपळनेर (ता.शिरुर), ६७ वर्षीय पुरुष वहाली (ता.पाटोदा) यांचा समावेश आहे.