शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परळीला जिल्ह्याचा दर्जा द्यावा; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने बुधवारी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध शहर आहे. परळीला असलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणाºया विजेचा राज्यासह संपूर्ण देशाला पुरवठा होतो. दळणवळणाच्या दृष्टीने याठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, ज्यामुळे शहराचा इतर राज्यातील प्रमुख शहरांशी आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दैनंदिन संपर्क साधला जातो. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर हे शहर आता आले असून शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत, ही शहर विकासाच्या दृष्टीने उपलब्धी आहे.

परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, ही येथील जनतेची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. शहर व तालुक्याचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा विषयक वातावरण अतिशय चांगले असून अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. परळी हे सध्या तालुक्याचे ठिकाण असले तरी कापूस उत्पादक पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे व अन्य काही विभाग स्तरावरचे कार्यालय याठिकाणी आहेत. शहर व तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. वाण धरणात मुबलक पाणी आहे.

सध्या या शहराला असलेले बीड हे जिल्हयाचे ठिकाण शंभर किमी दूर व प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे व त्रासदायक आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने योग्य आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश गिते, प्रकाश जोशी, अरूण टाक, प्रा. दासू वाघमारे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, उमाताई समशेटे, राजेंद्र ओझा, महादेव ईटके, रवि कांदे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे, मोहन जोशी, सचिन गिते, नितीन समशेटे, अरूण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, गोविंद चौरे, गणेश होळंबे, फैसल कुरेशी, स. जहीर, रमेश गायकवाड, तानाजी वाव्हळेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.परळीत या आहेत सुविधावीज केंद्र, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग यामुळे याठिकाणी उद्योग व व्यापार वाढीला मोठी चालना मिळाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व त्याच्याशी संलग्न असलेले वीज निर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी यामुळे साखर उत्पादन होण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरूणांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे.