शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना रेशन किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

धारूर : बीड जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना नुकतेच किराणा सामानाचे वाटप केले. ग्रामीण विकास केंद्र ...

धारूर : बीड जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना नुकतेच किराणा सामानाचे वाटप केले. ग्रामीण विकास केंद्र व जनसाहस इंडिया या संस्थेच्यावतीने आधार देण्याचे काम केले आहे.

बीड जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना परिस्थितीमुळे लॉॅकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनमुळे ऊसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणीत सापडले. हाताला काम नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ऊसतोड कामगारांना ऊसतोडीवरून परत येताच लॉकडाऊनचा सामना करावा लागला. त्यामुळे मुलांना पालनपोषण करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला रेशन किट वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील मालीपारगाव, पुरूषोत्तमपुरी, ब्रह्मगाव, राजेवाडी, डुकडेगाव, माणिकनगर, पुसरा या गावांत २५० कुटुंबांना एक महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले. यामध्ये २५ किलो गव्हाचा आटा, १० किलो तांदुळ, २ किलो तेल, साखर, मिरची, मसुरडाळ, मूगडाळ, मीठ, हळद, साबण, सॅनिटाइजर, मास्क आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेचे जिल्हा समन्वयक परमेश्वर अडागळे, दत्ता आवाड, महादेव उमाप, बाजीराव खंडागळे, शरद लोखंडे, रोहित आवाड, बाबा मुजमुले, जयश्री लोखंडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून कष्टकरी, गरीब, विधवा महिला, अपंगांना आधार देण्याचे काम केले.

===Photopath===

290621\img_20210629_192054.jpg

===Caption===

ग्रामीण विकास केंद्र व जनसाहस इंडिया या संस्थेच्या वतीने ऊस तोड कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.