शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या नगराध्यक्षांवर होणार अपात्रतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST

बीड : बीड नगरपालिकेेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता दंडेप्रकरण चांगलेच भोवले आहे. अमर नाईकवाडेंनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ...

बीड : बीड नगरपालिकेेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता दंडेप्रकरण चांगलेच भोवले आहे. अमर नाईकवाडेंनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत व सा.बां. औरंगाबादच्या मुख्य अभियंत्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यास निर्देशित केले आहे.

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत यांच्याकडे २ फेब्रुवारी ते १३ मे, २०१९ पर्यंत देण्यात आला होता, परंतु त्यानंतरही त्यांनी २७ जून, २०१९ रोजी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने सा.बां. औरंगाबादचे मुख्य अभियंता यांच्याकडे विनंती करून एस.एस.दंडे यांना सोनपेठवरून विविध रस्ते विकास कामासाठी बीडमधील उपअभियंतापदाचा अतिरिक्त पदभार देण्यासाठी विनंती केली. विशेष म्हणजे, हे पद रिक्त नसतानाही प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करणे चूक आहे. हाच धागा पकडून अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. नंतर याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. या सर्व बाबींचा आढावा घेत, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुनावणी घेत आदेश दिले. यात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व मुख्य अभियंता यांना रिक्त पद नसतानाही प्रतिनियुक्तीवर नेमणूक करता येत नसल्याचे सांगितले, तसेच २७ जून, २०१९ रोजीचे पत्र बनावट आहे. नाईकवाडेंनी वादातील पत्र मागविले, तेव्हा ते नाही असे सांगितले, परंतु सुनावणीदरम्यान ते सादर केले, यासारख्या मुद्द्यांवर ठपका ठेवत त्यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई, तर तत्कालीन मुख्याधिकारी सावंत व मुख्य अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच वादातील प्रत उपलब्ध नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यावरही विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोट

सोनपेठ येथील वादग्रस्त उपअभियंता दंडे यांना बीडमध्ये खोट्या स्वाक्षरी आणि बनावट पत्र तयार करून आणण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी व सा.बां.औरंगाबादचे मुख्य अभियंता याला जबाबदार होते. त्यामुळेच मी पुराव्यानिशी तक्रार केली होती. यावर निर्णय झाल्याने समाधानी आहे.

अमर नाईकवाडे

नगरसेवक तथा तक्रारदार बीड

तक्रारदाराने माझे नाव तक्रारीतून वगळले होते, परंतु पालकमंत्री व आमदारांच्या राजकीय दबावापोटी माझे नाव गोवण्यात आले. शहरात मोठी कामे सुरू आहेत. त्यासाठी एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणणे चुकीचे नाही. अशा किरकोळ प्रकरणात थेट अपात्रतेची कारवाई करता येत नाही. केवळ राजकीय विरोध म्हणून असे केले जात आहे.

- डॉ.भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, बीड