शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

वाद विकोपाला गेला अन तरुणाने दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खातमा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 13:07 IST

दोघे भाऊ वडिलांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाल्याने तरुणाचा संताप अनावर

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खूनक्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला, आरोपी फरार

बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोघा सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.

राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके (२३) याच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी हा वाद गावातच मिटवण्यात आला होता; परंतु सोमवारी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली. त्यानंतर परमेश्वरला समजवण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके त्याच्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आपल्या घरी ते दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. राम व लक्ष्मण साळुंके यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने परमेश्वर कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला.

राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघेही जागीच गतप्राण झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्या ठिकाणावरून फरार झाला होता. ठाणेप्रमुख सपोनि शरद भुतेकर, पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा वाद मिटवण्यासाठी नागापूर खुर्द येथील माजी सरपंच व या प्रकरणातील फिर्यादी विठ्ठल साळुंके यांनादेखील बोलावण्यात आले होते. घटनेचा पंचनामा करून माजी सरपंच व प्रत्यक्षदर्शी विठ्ठल साळुंके यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउनि ज्ञानेश्वर सानप करत आहेत.

कुटुंब पडले उघड्यावरराम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके हे दोघेही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मुलांचे शिक्षणदेखील सुरू होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून त्यांच्या मुलांच्या बरोबरीचा असलेल्या आरोपी परमेश्वर याने त्यांचा खून केल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

अधिकारी रात्रभर ठाण मांडूनया घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर व इतर अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड