शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमलेल्या गर्दीमुळे जयदत्त क्षीरसागरांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:23 IST

नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेतले.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना डावलले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

बीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले, यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेतले. यावेळी सभास्थळी झालेली गर्दी पाहून पुन्हा एकदा आ. जयदत्त क्षीरसागरांची जिल्हाभरात चर्चा झाली.मागील काही काळापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीपासून दूर असलेले आ.जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पक्षीय भूमिकेकेडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यासह इतर मतदार संघावर आ. जयदत्त क्षीरसागर यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजप देखील त्यांना जवळ करत आहे. म्हणूनच नगर पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कार्यक्रमास दिलेल्या निमंत्रणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या व पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, आ. आर. टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित व इतर नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमास आमंत्रित केले नव्हते.यावेळी झालेल्या कार्यक्रमास सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आ. जयदत्त क्षीरसागर यांची पुढील निवडणुकीत काय भूमिका असेल अशी चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले.वरिष्ठांच्या भूमिकेकडे लक्षआ. जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधून काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर