शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:20 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळून आल्याने उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हा कायदा लागू केला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

बीड : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळून आल्याने उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी हा कायदा लागू केला आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर व देशांतर्गत कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळत असल्याने हे प्रवासी देशाच्या विविध भागात प्रवास करीत आहेत. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या कायद्याद्वारे आखण्यात आल्या आहेत. याबाबत पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व सनियंत्रक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार घोषित करण्यात आले.या आदेशान्वये पोलीस विभाग, नगरपालिका, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आदी विभागांना सतर्क करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा व गैरसमज यांना अटकाव प्रतिबंध करणे, जिल्हा प्रशासन जिल्हा रुग्णालया मार्फत व तालुकास्तरावरील रुग्णलया मार्फत उपचार व आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, औषधे, मास्क याच्या अनुषंगिक बाबींवर नियंत्रण राखणे याच बरोबर जिल्हास्तरावर कोरोना विषाणू संसर्ग आजाराच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करणे या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.संपर्क साधण्याचे आवाहन मात्र, संपर्क होण्याची खात्री नाहीनागरिकांनी कोरोना संबंधित काही माहिती किंवा संशयित रुग्ण आढळल्यास प्रशासनाने अपत्ती व्यवस्थापनाचा दूरध्वनी क्रमांक ०२४४२-२२२६०४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मात्र, या दुरध्वनी क्रमांकावर फोन लागत नाही किंवा लागला तर तो उचलला जात नाही. त्यामुळे संपर्क होईल याची खात्री नागरिकांनी बाळगू नये. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडcorona virusकोरोना