शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एका दुचाकी चोरीच्या तपासातून १० दुचाकी चोरींचा झाला उलगडा; दोन आरोपी दिंद्रुड पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:29 IST

गेल्या कांही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.

दिंद्रुड (बीड ) : एका दुचाकी चोरीचा उलगडा केल्यानंतर दिंद्रुड पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. नितीन वसंत मुंडे ( रा.पहाडी दहिफळ ता.धारूर ) व गणेश काशिनाथ गायकवाड ( रा.पार्थी जि.परभणी ) अशी अटकेतील आरोपींची नवे आहेत. 

गेल्या कांही दिवसांपासून दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तेलगाव येथील एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेची दिंद्रुड पोलीसांनी गंभीरतेने दखल घेत तपास सुरु केला. पोलिसांनी काही तासांमध्ये दुचाकीसह गणेश काशिनाथ गायकवाड या चोरास अटक केली. चौकशीनंतर त्याने दुचाकी चोरीत आणखी काही साथीदार असल्याचे सांगितले. 

यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, डीवायएसपी जायभाय  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या. तसेच पोलिसांनी वडवणी येथून अन्य एक आरोपी नितीन वसंत मुंडे यास शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले. ही कारवाई सपोनि प्रभा पुंडगे, पीएसआय विठ्ठल शिंदे, अनिल भालेराव,  बालाजी सुरेवाड, सरवदे, संजय मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून इतर दुचाकी चोरींचा उलगडा यातून होण्याची शक्यता आहे. 

दोन्ही आरोपींची चौकशी सुरु आहे. यातून परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येतील. तसेच दुचाकी चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. - प्रभा पुंडगे, सपोनि 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड