शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट; निवृत्त शिक्षिकेला ८३ लाखांचा गंडा

By सोमनाथ खताळ | Updated: June 1, 2025 18:55 IST

digital arrest: निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून लाखो रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला.

सोमनाथ खताळ, बीड: मी महाराष्ट्र पोलिस बोलत असून, तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा, असे म्हणत व्हॉट्सॲपला व्हिडीओ कॉल करून निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे यादरम्यान तब्बल ८३ लाख रुपये ऑनलाइन हडप केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा (नाव बदलले, वय ६५, रा. अंबाजोगाई, जि. बीड) या निवृत्त शिक्षिका आहेत. २० मे रोजी त्यांच्या ना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी महाराष्ट्र पोलिस संजय पिसे बोलतो, असे त्याने सांगितले. नंतर हिंदी भाषेत तो म्हणाला, की तुमच्या आधार कार्डवरून दुसरे सीमकार्ड १६ एप्रिल रोजी घेतले आणि तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंग व अतिरेक्यांना फंडिंग झाली आहे. तुम्ही तीन दिवसांत सर्व सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला यातून सोडवू. यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना स्पेशली विनंती केल्याचा विश्वास दिला. त्यानंतर मराठीतून बोलत व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. खरे वाटावे म्हणून मुंबई पोलिसचे ऑफिस, झेंडे, लोगो पाठीमागे लावला. हे सर्व खरे असे समजून पूजा यांनी २१ मे रोजी पहिल्यांदा एकाचवेळी ३५ लाख १० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी त्यांनी २९ मेपर्यंत ८३ लाख १ हजार ८१६ रुपये सायबर भामट्यांना पाठविले. त्यानंतर त्यांनी पूजा यांचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

प्लॉट गहाण ठेवून सावकाराकडून घेतले कर्जसायबर भामट्यांनी पूजा यांना भीती दाखवत तुमच्याकडे कोणती संपत्ती आहे, हे आम्हाला येथे दिसते. तुम्ही लपवून ठेवू नका, असे सांगितले. त्यानंतर पूजा यांनी प्लॉट गहाण ठेवून त्यावर खासगी सावकाराकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. २९ मे रोजी हे सर्व पैसे भामट्यांना ऑनलाइन पाठविले.

टॅग्स :Beedबीडcyber crimeसायबर क्राइम