शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालणे अवघड, त्यात अवजड वाहनांची भर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:22 IST

माजलगाव : अतिक्रमणे व हातगाड्यांमुळे असेच चालणे अवघड झालेले असताना शहरातून अवजड तसेच उसाची वाहने जात असल्याने दिवसभर ट्रॅफिकजामचा ...

माजलगाव : अतिक्रमणे व हातगाड्यांमुळे असेच चालणे अवघड झालेले असताना शहरातून अवजड तसेच उसाची वाहने जात असल्याने दिवसभर ट्रॅफिकजामचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असताना शहर पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

माजलगाव शहरातील नागरिकांना शहरात कोठेही जायचे झाल्यास त्यांना केवळ एकच मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून जागोजागी हातगाडे लावण्यात येतात. यामुळे या रस्त्यावर साधे चालणेही अवघड झाले आहे तर वाहने चालवणे तर जिकिरीचे ठरत आहे. शहराला बायपास असताना व अतिक्रमणांमुळे चालणे अवघड झाले असताना अवजड आणि उसाची वाहने मोठ्या प्रमाणावर जात आहेत. उसाच्या डबल ट्रॉली जोडून बिनधास्तपणे ट्रॅक्टर चालविले जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ही वाहने शहरातून जात असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. या मुख्य रस्त्यावरील ४-५ चौकात एकही वाहतूक पोलीस दिसून येत नाही. सध्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह महिला पुरूषांचा मुख्य रस्त्यावर वावर वाढला असून त्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक पोलीस असताना ते केवळ अवैध प्रवासी वाहनांच्या पाठीमागे फिरताना दिसतात. अतिक्रमणे व अवजड वाहनांमुळे नागरिकांना त्रास होताना पोलिसांना याचे काहीच घेणे देणे राहिलेले दिसत नाही.

फलक नावालाच

शहर पोलिसांनी शहरात येणाऱ्या दोन्ही बाजूने शहरात अवजड व उसाची वाहने आणू नयेत. आणल्यास कारवाई करण्यात येईल असे फलक लावले आहेत. हे फलक लावलेले असताना अवजड व उसाची वाहने सर्रास शहरातून येत असल्याने लावलेले फलक केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

कारवाई करणार

शहरात जागोजागी आम्ही फलक लावून वाहने शहरात आणू नये असे आवाहन केले आहे. जर अवजड व उसाची वाहने येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- धनंजय फराटे , पोलीस निरीक्षक ,शहर पोलीस ठाणे, माजलगाव