शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

डायल ११२ ची ट्रायल सुरू ! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

बीड : पोलिसांचे तात्काळ साहाय्य हवे असल्यास आतापर्यंत १०० हा हेल्पलाइन क्रमांक होता. तो आता बदलला जाणार असून, त्याऐवजी ...

बीड : पोलिसांचे तात्काळ साहाय्य हवे असल्यास आतापर्यंत १०० हा हेल्पलाइन क्रमांक होता. तो आता बदलला जाणार असून, त्याऐवजी ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येणार आहे. दरम्यान, डायल ११२ या हेल्पलाइन सुविधेची सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात ‘ट्रायल’ सुरू आहे.

डायल ११२ या हेल्पलाइन सुविधेद्वारे नागरिकांना तात्काळ पोलिसांचे साहाय्य व्हावे, यासाठी १५२ दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पिंक मोबाइल पथकाद्वारे महिलांना साहाय्य केले जाणार असून, त्यासाठीदेखील स्वतंत्र चारचाकी वाहने देऊन महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या वाहनांचा लोकार्पण सोहळा २२ जून रोजी पोलीस मुख्यालयावर पार पडला. दरम्यान, जिल्ह्यात २८ पोलीस ठाणे असून, आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिसांची मदत घेण्यासाठी १०० हा क्रमांक डायल करावा लागत होता. त्याऐवजी आता ११२ डायल करून पोलिसांची मदत घेता येणार आहे. ११२ वर कॉल केल्यानंतर सेंट्रलाइज कंट्रोल रूमला अवघ्या काही सेकंदांत कॉल कोठून आला, ते संबंधितांना कळेल. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी या कॉलची माहिती देतील. घटनेचे गांभीर्य ओळखून आवश्यकतेनुसार मदत करणे सोयीचे होणार आहे. दरम्यान, डायल ११२ हेल्पलाइन सुरू होणार असल्याने अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली असून, नियंत्रण कक्षातून २४ तास कामकाज चालणार आहे. त्यासाठी ९ प्रशिक्षित अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

....

पहिल्या दिवशी नाही एकही कॉल

दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी बीड व अहमदनगर जिल्ह्यांत डायल ११२ हेल्पलाइन सुविधेची ट्रायल घेण्यात आली. दिवसभरात बीडमधून एकही कॉल आला नाही. २ ऑक्टोबर रोजी सर्वत्र एकाचवेळी ही सुविधा सुरू होणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू

आहे.

------------

डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल केल्यावर जलदगतीने संबंधितांच्या मदतीला पोलीस धावून जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षित अंमलदारांची नेमणूक केली आहे. २ ऑक्टोबर रोजी ही सुविधा सुरू होणार आहे. त्यासाठी सध्या ट्रायल घेेणे सुरू आहे.

-ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक निरीक्षक व नोडल ऑफिसर, डायल ११२

.....