शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सोयीने काम करणाऱ्यांना दणका; जिल्हा परिषदेत ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:31 IST

Beed Zilla Parishad जिल्हा परिषदेचे  जवळपास ३०० कर्मचारी पाच वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

ठळक मुद्देसीईओंच्या आदेशाने खळबळ मुळ ठिकाणी हजर होण्याचे निर्देश

बीड : शासनाच्या तरतुदीनुसार न झालेल्या तसेच राजकीय आश्रयाचा फायदा घेत झालेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील नियमबाह्य प्रतिनियुक्त्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी एका आदेशाद्वारे १९ ऑक्टोबर रोजी रद्द केल्या. प्रतिनियुक्त्या रद्द केेलेल्या वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांना तात्काळ खातेप्रमुखांनी कार्यमुक्त करण्याचे व प्रतिनियुक्त्या रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुळ ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषदेचे  जवळपास ३०० कर्मचारी पाच वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. मात्र  प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल तक्रारी होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सीईओ कुंभार यांनी हे आदेश जारी केल्याने खळबळ उडाली आहे. शासन निर्णयाचा तरतुदीनुसार जिल्हा परिषदेतील गट व कर्मचाऱ्यांचे अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय कारणास्तव प्रतिनियुक्त्या करावयाच्या असतील तर त्या विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने कराव्यात म्हणून शासनाच्या सूचना आहेत.

 

विभागीय आयुक्तांच्या परिपत्रकानुसार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या उक्त तरतुदीनुसार झाल्या नाहीत अशा सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या  ठिकाणी तात्काळ रुजू होऊन संबंधित कार्यालय प्रमुखामार्फत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याबाबत विलंबाची सर्वस्वी जबाबदारी कार्यालय प्रमुख व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर राहील यासंदर्भात योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे.

 

गरज असल्यास स्पष्ट अहवाल सादर कराया आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांचे कार्यालयीन कामकाज प्रभावी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास किंवा मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने कामकाज करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीने आवश्यकता असल्यास तसे स्वतंत्र प्रस्ताव विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी कारणमिमांसेसह व स्वयंस्पष्ट अहवाल कार्यालयास सादर करावेत अशा सूचनाही सीईओ अजित कुंभार यांनी दिल्या आहेत. 

टॅग्स :BeedबीडTransferबदली