शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

अंबाजोगाई : मागील वर्षाच्या काळात कोरोना संकटामुळे लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहेत. लोक त्रस्त आहेत. रोजगार आणि व्यापार ...

अंबाजोगाई :

मागील वर्षाच्या काळात कोरोना संकटामुळे लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहेत. लोक त्रस्त आहेत. रोजगार आणि व्यापार नसल्याने आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यास अडचण निर्माण होत आहे, तरी या प्रश्‍नी वीज बिलाचे हप्ते पाडून दिल्यास ग्राहकांना बिल भरणे सोयीचे होईल, तरी या प्रश्‍नी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सक्तीची वीज बिल वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली.

जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने यांनी महावितरण कार्यकारी अभियंत्यांना २५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नाशिक परिमंडळात वीज ग्राहकांना मोबाइलद्वारे १५ दिवसांची मुदत दिली जात आहे; मात्र आपल्याकडे वीज ग्राहकांचा पुरवठा तोडण्याचे काम केले जात आहेत, यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. त्यांच्यात आपल्या कार्यालयाविषयी नाराजी निर्माण झाली आहे. दिलेल्या निवेदनाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर काँग्रेस पक्षाचे डी.के.कांबळे, नगरसेवक धम्मपाल सरवदे, अशोक देवकर, जावेद गवळी, अमोल मिसाळ, भारत जोगदंड, सचिन गालफाडे, दत्ता काटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता महावितरण कंपनी यांना देण्यात आले आहेत.