सदरील रस्ता बनविण्यासाठी निधी मंजूर झाल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष, त्यानंतर नगरसेवकांनी रस्ता कामाला लवकर सुरुवात होईल, असे सांगितले. महिना उलटून गेल्यानंतरही काही रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही, यामुळेच प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत. आधी रस्ता करा, त्यानंतर तुमचे राजकारण करा, असे नागरिक बोलून दाखवीत आहेत.
या रस्त्यावरून वाहन चालवायचे अवघड होत असून, अनेकांना मणक्याचे आजार वाढत आहे. कित्येक नागरिकांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे; परंतु कोणीही रस्ता बनविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. रस्ता बनविण्याच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. बीडमध्ये इतर ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असताना अमराई भागातील रस्त्याचे काम का केले जात नाही. अमराई, बालेपीरचा भाग बीडमध्ये येत नाही का, असा प्रश्न प्रभागातील नागरिक विचारत आहेत.