शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

नेकनूर : सीएससीचा (कॉमन सर्व्हिस सेंटर) अत्यावश्यक सेवेत समावेश करून चालू ठेवण्याची मागणी जिल्ह्यातील सुमारे एक हजार सीएससी चालकांनी ...

नेकनूर : सीएससीचा (कॉमन सर्व्हिस सेंटर) अत्यावश्यक सेवेत समावेश करून चालू ठेवण्याची मागणी जिल्ह्यातील सुमारे एक हजार सीएससी चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाचे संकट गेल्या दोन वर्षांपासून आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकर वर्ग वगळता सीएससी केंद्राचे व्यावसायिक बांधव, मोलमजुरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचालकांचा व्यवसाय बंद असल्याने तसेच उत्पन्नाचे इतर कोणतेही मार्ग नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबी शासनाने गांभीर्याने घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरचालकाचे घरभाडे, दुकान भाडे, बँकेचे कर्ज, वैद्यकीय खर्च व कौटुंबिक खर्च भागवणे इतपत पैसा सीएससी केंद्र चालकांच्या खात्यात वर्ग करावा किंवा सीएससी सेंटरचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्याच्या ऑनलाइनच्या युगात कॉमन सर्व्हिस सेंटर हे एक सर्वसामान्य जनतेसाठी दुवा ठरले आहे. सीएससी मार्फत कोविड लससाठी मोफत रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच केंद्राद्वारे बँकिंग सुविधा दिली जाते. शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल वर बी-बियाणे मिळण्यासाठी नोंदणी करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कॉमन सर्व्हिस सेंटरचा अत्यावश्यक सेवेत सामावून घेऊन सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी सीएससीचालकांनी केली आहे.