शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ब्रेक द चेनबाबत फेरविचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST

शिरूर कासार : जिल्हाधिकारी बीड यांनी "कोरोना" नियंत्रण संबंधात लागू केलेली नियमावली अर्थात ब्रेक द चेन अनाकलनीय असून, दिलेल्या ...

शिरूर कासार : जिल्हाधिकारी बीड यांनी "कोरोना" नियंत्रण संबंधात लागू केलेली नियमावली अर्थात ब्रेक द चेन अनाकलनीय असून, दिलेल्या वेळापत्रकाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी सर्जेराव तांदळे विचार मंचचे रायमोह येथील गोकुळ सानप यांनी केली आहे. या आदेशामुळे छोटे व्यापारी, मोलमजुरी करणारे मजूर, तसेच हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे प्रशासनाने आदेशाबाबत फेरविचार करावा, असे सानप यांनी म्हटले आहे.

शिरूरकरांचा पांच दिवसांचा उपवास सुरू

शिरूर कासार : येथील जाज्वल्य देवस्थान असलेले शक्तिपीठ म्हणे कालिका देवी, देवीचा कुलाचार असलेला नव्याच्या अमावास्येचा कुलाचार अवघ्या पाच दिवसांवर आला असल्याने बुधवारपासून देवी भक्त एक कर्ता प्रतिनिधी पांच दिवसांचा उपवास करत असतो. या काळात पादत्राणे वर्ज्य असते. अमावास्येला देवीची पालखी, गंगाजलाने अभिषेक व पुरण पोळीचा नैवेद्य समर्पण केल्यानंतरच शिरूरला नवे गहू खाण्यास सुरूवात होते. तोपर्यंत गिरणीतसुध्दा नवे गहू दळून दिले जात नाहीत. ही परंपरा आजही शिरूरकर सांभाळत आहे. शासन नियमावलीतच हा कुलाचार उत्सव पार पाडला जाणार असल्याचे कालिका देवी विश्वस्त अध्यक्ष रोहिदास पाटील व सचिव बापुराव गाडेकर यांनी सांगितले.

आजोळ परिवारास सात क्विंटल धान्यासह किराणाची मदत

शिरूर कासार : तालुक्यातील राक्षस भुवन येथे "आजोळ परिवार" हे निराधार, निराश्रित, दिव्यांगांसाठी हक्काच घर सुरू आहे. मदतीच्या बळावर सुरू असलेल्या या संस्थेस आधार माणुसकीचा ग्रुपचे रणजित पवार, किरण बेद्रे, कृष्णा आदींनी मंगळवारी सात क्विंटल धान्य, किराणा साहित्य तसेच अंधांसाठी काठी व फळे भेट दिली. मदतीबद्दल संस्थेचे कर्ण तांबे यांनी आभार मानत ऋण व्यक्त केले.

शिरूर सिंदफना रस्त्यावर खड्डे

शिरूर कासार : तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करण्यासाठी दहा - बारा गावांची वर्दळ असलेल्या शिरूर सिंदफना या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची दुरूस्तीची गरज असल्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

विनामास्क संचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

शिरूर कासार : कोरोना प्रतिबंधासाठी तोंडावर मास्क लावणे हे अनिवार्य असताना काही लोक विनामास्क संचार करत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी नगर पंचायतीने अडीच हजार रुपये दंड वसूल केला. कामाशिवाय बाहेर फिरूच नका. गरज पडलीच तर मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.

गावात तोंडाला मास्क तर शेतात मोकळा श्वास

शिरूर कासार : कोरोचा वाढता उद्रेक लक्षात घेता गावांत फिरताना तोंडावर मास्क असणे बंधनकारक असले तरी शेतात काम करणारा शेतकरी मात्र शेतात मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र शिरूर परिसरातील शेतशिवारात फेरफटका मारल्यावर दिसून आले.