शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

मजुरांसाठी कामे उपलब्ध करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

... अंबाजोगाई ते देवळा रस्त्यावर खड्डे अंबाजोगाई : तालुक्यातील अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव, ...

...

अंबाजोगाई ते देवळा रस्त्यावर खड्डे

अंबाजोगाई : तालुक्यातील अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव, अशा अनेक रस्त्यावर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालविताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. तरी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

...

अंबाजोगाईला मुबलक पाणी

अंबाजोगाई : शहरात अनेक भागांत पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

...

कोरोना नियमांचे उल्लंघन

आष्टी : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. आष्टी तालुक्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

....

हातपंपाच्या दुरुस्तीची मागणी

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. पावसाने ओढ दिल्याने दुष्काळीस्थिती आहे. त्यात अनेक खेडेगावातील हातपंप नादुरुस्त आहेत. हे पंप तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

...

रानडुकरांचा उपद्रव

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील धानोरा, हिवरा, अंभोरा, पिंपरखेड परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व ठिबक संचांचे ही रानडुकरे नासधूस करीत आहेत. तरी या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.