शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नामफलक लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST

----------------------- पदोन्नती करण्याची मागणी अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. ...

-----------------------

पदोन्नती करण्याची मागणी

अंबाजोगाई : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यापूर्वी पदोन्नती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. मात्र या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्षच करण्यात आले आहे. आता याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

---------------------------

वाढत्या वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई: महावितरण कंपनीकडून वारंवार वीजदरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीजग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ही वाढती महागाई व सतत वाढत जाणारी वीजबिले यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. शासनाने या संदर्भात ठोस उपाययोजना करुन वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्याण काळे यांनी केली आहे.

-----------------------

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष आहे.

------------------------

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

अंबाजोगाई: तालुक्यातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------------