शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या राखमिश्रित विटांना चार राज्यांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:43 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेला आधार। औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळसा जाळल्यानंतर तयार होणाऱ्या राखेतून मोठा रोजगार

संजय खाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अनेक संच बंद असतानाही वीजनिर्मितीसाठी पूर्वी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. राखेपासून तयार झालेली वीट तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकराज्यात लोकप्रिय झाली आहे. या व्यवसायामुळे कामगारांना रोजगार मिळत आहे.राखमिश्रित वीट बांधकामासाठी वजनांस हलकी व टिकण्यास मजबूत असल्याने परळीच्या विटास मोठी मागणी आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईपर्यंत ही वीट जाते. शिवाय इतर राज्यातही पुरवठा होतो. तालुक्यातील टोकवाडी, नागापूर, दाऊतपूर, चांदापूर रोडवर, सिरसाळा व इतर प्रत्येक वीटभट्टीवर किमान ५० वीट कामगारांना दुष्काळात आधार मिळाला आहे. तर तालुक्यात ३० हजार कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या दिवशी दर सोमवारी हे वीटभट्टी कामगार कपडे, किराणा, भाजीपाला व खरेदीसाठी परळीच्या बाजारपेठेत गर्दी करतात. बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल होते. नोव्हेंबर ते मे दरम्यान विटेचे उत्पादन केले जाते. वीटभट्टीवर कामासाठी जिंतूर, परभणी, गंगाखेड, लातूर येथून कामगार आलेले आहेत. कामगारांना ३५० रु पये रोज हजेरी मिळते. ७० टक्के राख व ३० टक्के मातीचा वापर करून वीट बनविली जाते. राखेमुळे वीट दर्जेदार बनते. पाणी विकत घेतले जाते. वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो. सध्या एक संच चालू आहे. दगडी कोळसा रेल्वेने कोळशाच्या खाणीतून परळीत येतो. कोळसा वीजनिर्मितीसाठी जाळल्यानंतरची राख दाऊतपूर व इंदपवाडी- टोकवाडी यथील राख तळ्यात पाण्यावाटे पाईपमधून सोडली जाते. ही राख ट्रॅक्टर, हायवा या वाहनातून वाहतूक केली जाते. ती राख वीटभट्टी चालक घेतात व सिमेंट उत्पादनासाठीही घेतली जाते. दहा वर्षांपासून परळी तालुक्यातील वीट उद्योग फोफावला आहे. यातून अनेकांचे जीवनमान उंचावले आहे तर कामगारांना रोजगार मिळत आहे. परळी शहर व परिसर राखेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत.अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर याच राखेने अनेकांचे म्हणजे वीट उद्योग चालकांचे व कामगारांचे जीवन फुलल्याचे टोकवाडीचे बालाजी मुंडे, दाऊतपूरचे श्रीकांत फड म्हणाले.राखमिश्रित वीट टिकाऊ, मजबूतऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी वापरलेल्या दगडी कोळशाच्या जळणानंतर राखतळ्यात सोडलेल्या राखेचा वापर वीटभट्टीसाठी करण्यात येतो. या राखेपासून तयार झालेली वीट राखमिश्रित वीट टिकण्यास मजबूत असल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यात मागणी वाढली आहे. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Beedबीड