वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री सुरूच
माजलगाव : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरामध्ये अगदी सहजरित्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. तरीदेखील विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
धूम स्टाईलने दुचाकी चालविणारांना आवरा
बीड : शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून महाविद्यालयीन तरुण वेगाने आपली वाहने चालवत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अल्पवयीन मुलेही दुचाकी सुसाट चालवतात. शहरात धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खंडित वीज पुरवठा, शेतकरी वैतागले
बीड : तालुक्यातील पेंडगाव, पारगाव जप्ती, हिंगणी येथील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.