शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बसथांब्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने ...

बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होते. वाहनांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी येथे बसथांबा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गुटखा विक्री तेजीत

पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रासपणे गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरासह तालुक्यात कारवाई झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छतेची मागणी

वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत. परंतु, या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.

वाहनचालकांकडून नियमांची अवहेलना

केज : शहर व परिसरात वाहन चालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अ‍ॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक रिक्षांची बिनधास्तपणे पार्किंग असते. मोकळ्या जागेत पार्किंग न करता सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.

ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री

गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.