मोबाईल चोर वाढले
धारूर : शहरात सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक मोबाईल चोर, पॉकिटमार सक्रिय झाले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना फटका बसला आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गाजर गवताचा वेढा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
डिजिटल व्यवहारात वाढ
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अंबाजोगाई शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यास दुकानदारही प्राधान्य देत असल्याने ही प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.
अवैध वाहतूक
अंबाजोगाई : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. जवळपासच्या खेडेगावांना बस वाहतूक सुरू झाली नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीवरच नागरिकांचा प्रवास सुरू आहे.