शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीमध्ये तलवार नदीचे खोलीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

आष्टी : नाम फाउंडेशन, आष्टी नगरपंचायत, आ. सुरेश धस मित्र मंडळ व लोकसहभागातून आष्टी शहरातून जाणाऱ्या तलवार नदीचे ...

आष्टी : नाम फाउंडेशन, आष्टी नगरपंचायत, आ. सुरेश धस मित्र मंडळ व लोकसहभागातून आष्टी शहरातून जाणाऱ्या तलवार नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरणाचे उद्घाटन आ. सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील तलवार नदी मानवी अतिक्रमण, वेड्याबाभळी तसेच गाळामध्ये पूर्णपणे भरल्या गेल्याने तिचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. आष्टी नगरपंचायतचे पदाधिकारी व आ. सुरेश धस मित्र मंडळ तसेच शहरातील व्यापारी व सर्व घटकांतील नागरिकांनी चार लाख रुपये लोकवर्गणी जमा केली. यातून नदी खोलीकरण व रुंदीकरणाचा संकल्प केला.

अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनकडून २० लाख रुपये मिळणार आहेत.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरण अभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी ३०० ते ४०० फुटांपर्यंत प्रचंड खालावत आहे. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेत आष्टी येथील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी गावात फिरून गावकऱ्यांकडून या कामासाठी साधारण चार लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली.

याशिवाय नाम फाउंडेशन यांच्याकडून २० लाख रुपये मिळणार आहेत. तलवार नदीत पोकलँड मशीनने कामाचे उद्घाटन आ. सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार धस म्हणाले, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद आनासपुरे, जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या माध्यमातून नदीच्या खोलीकरणासाठी निधी प्राप्त करणार आहे. तसेच नदी परिसरातील मानवी अतिक्रमण देखील स्वतःहून काढून घ्यावेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, नाम फाउंडेशनचे समन्वयक औदुंबर खिलारे, महेश शिंदे, शैलेश सहस्रबुद्धे, बाळासाहेब घोडके, ॲड. अविनाश निबाळकर, सादिक कुरेशी, नगरपंचायतचे प्रेमकुमार म्हस्के, दिलीप निकाळजे, राजु देशमुख, सय्यद शफी, विजय धोंडे, किशोर धोंडे, दाऊद सय्यद, सलीम कुरेशी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी : आष्टी येथील तलवार नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, सुशोभीकरणाचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला. लोकसहभाग आणि नाम फाउंडेशनच्या मदतीतून तलवार नदीचे रूपडे पालटणार आहे.

===Photopath===

290421\29bed_13_29042021_14.jpg~290421\29bed_12_29042021_14.jpg