शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा : विनायक मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:03 IST

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत व्यसनाधिनतेच्या विरोधात समाजप्रबोधनासाठी पुढील साहित्य संमेलनाचे बीड येथे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

ठळक मुद्देबीडमध्ये व्यसनासंदर्भात प्रबोधन साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामधील तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे या पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. तरूणाईला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनाधिनतेच्या विरोधात प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन होऊन ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत व्यसनाधिनतेच्या विरोधात समाजप्रबोधनासाठी पुढील साहित्य संमेलनाचे बीड येथे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, मराठवाडा विकास मंच, मुंबई व कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीडमधील जिल्हा क्रीडा संकुलात व्यसनमुक्त अभियानानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बडोले बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, आ. विनायक मेटे, माजी आ. बदामराव पंडित, संदीप क्षीरसागर, पत्रकार विजयराज बंब, राजेंद्र म्हस्के, अशोक हिंगे, अशोक लोढा, कल्याण आखाडे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, देशाच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा असलेली तरूणाई आज व्यसनाच्या आहारी जात आहे. ही देशासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. या तरुणाईला व्यवसापासून दूर ठेवण्यासाठी राज्यात विविध संस्थांच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विरोधात विविध प्रबोधनात्मक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानात उत्कृष्ट काम करणाºया संस्थांना शासनामार्फत पुरस्कृत करण्यात येत आहे.

मद्यपान, तंबाखू, गुटखा यासारख्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुणाईच्या आरोग्यावर भयंकर असे परिणाम होण्याबरोबरच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विकृती वाढत आहे. कुटुंबाची राखरांगोळी करणाºया, तसेच अनारोग्य निर्माण करणाºया या व्यसनाधिनतेच्या विरोधात आ. मेटे यांनी उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनाविरोधात प्रबोधनासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री जानकर म्हणाले की, व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होणाºया तरुण पिढीला व्यसनापासून दूर करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. समाजातील प्रत्येक नागरिकाने स्वत: व्यसनापासुन दूर राहून कोणी व्यसन करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, शहरातील नागरिक, महिला, तरुण, तरुणींची बहुसंख्येने उपस्थिती होती.तरूण पिढीला व्यसनापासून रोखणे आवश्यककार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. विनायक मेटे म्हणाले की, राज्यात व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत आहेत. यात तरु णपिढी मोठया संख्येने ओढली जात असून, तरूणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. त्याच विचारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा. त्याचप्रमाणे या कामात सर्व पदाधिकाºयांनी एकत्रीत येऊन काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विजयराज बंब यांनीही मनोगत व्यक्त केले.