शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटप करणे बॅँकेचे कामच, कोणाला फसविलेले नाही-सारडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:59 IST

कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यासंदर्भात काही तक्र ारी असतील तर त्यासाठी सहकार कायदा आहे.

ठळक मुद्देयुक्तिवाद संपला : कपोकल्पित आरोप, शब्दांचा खेळ करुन गुन्हे दाखल केले

बीड : कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यासंदर्भात काही तक्र ारी असतील तर त्यासाठी सहकार कायदा आहे. आम्ही त्या चौकशीला सामोरे जात आहोत. मात्र त्यासाठी आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊच शकत नाही. मात्र केवळ शब्दांचा खेळ करून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातून आपल्याला डिस्चार्ज करावे, अशी विनंती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.जिल्हा बँकेने अंबाजोगाई कारखान्यास दिलेल्या कर्ज प्रकरणात दाखल गुन्ह्यातून आपल्याला वगळण्यात यावे अशी याचिका सुभाष सारडा यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. कचरे यांच्या न्यायालयात केली असून या प्रकरणात त्यांनी स्वत: युक्तिवाद केला.गुरुवारी त्यांचा युक्तिवादाचा तिसरा दिवस होता. यावेळी सारडा यांनी, कर्ज वाटप करणे हे बँकेचे कामच असते, ते आम्ही केले आहे. यात आम्ही कोणाला फसवले नाही. अंबाजोगाई कारखान्याच्या संचालकांना आम्ही ओळखतही नाही, केवळ जिल्ह्यातील ५० वर्षांपासूनची संस्था टिकावी हाच कर्ज देण्यामागचा हेतू होता. आम्ही ९ टक्क्यांनी ठेवी स्वीकारतो आणि १७ टक्क्यांनी कर्ज देतो. यात बँकेचे हित आणि उत्कर्षच पाहिला आहे. आमच्या काळात बँकेची प्रगतीच झाली आहे. त्यामुळे फसवणूक, संगनमत हे आरोप मुळातच कपोकल्पित आहेत. आमच्या कोणत्याही संचालकाच्या खात्यावर कोणाकडूनही एक रुपयाही आला नाही, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा देखील लागू होत नाही . तसेच ठेवीदारांचे हित साधणाऱ्या कायद्याच्या कक्षेत बँक येतच नाही, त्यामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेला कोणताच आरोप ठेवता येत नाही. बँकेसाठी स्वतंत्र सहकार कायदा असून त्याच्याअंतर्गत चौकशीसाठी आपण तयार आहोत, सामोरे जात आहोत, म्हणून या गुन्ह्यातील आरोपांमधून आपल्याला डिस्चार्ज करण्यात यावे असे सारडा म्हणाले. यातील सारडा यांचा युक्तिवाद संपला असून यात आता अभियोग पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय निकाल सुनावणे अपेक्षित आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालय