लोखंडी सावरगाव : घरासमोरचा रस्ता ओलांडणाऱ्या इसमाचा भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास लोखंडी सावरगाव येथे हा अपघात झला. यशवंत वैजनाथ बनसोडे (८०) असे मृताचे नाव आहे. राज्य महामार्गाचे संथगतीने चाललेले काम, महावितरण कंपनीचे मध्येच अडथळा करणारे पोल, अरुंद रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे लोखंडी सावरगाव परिसरातील नागरिकांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. यशवंत बनसोडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात महादेव यशवंत बनसोडे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरुण मोरे हे तपास करीत आहेत.
घरासमोरचा रस्ता ओलांडताना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST