जिल्ह्यात शुक्रवारी ३ हजार ८१३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १७६ पॉझिटिव्ह, तर ३ हजार ६३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी ४०, बीड ४७, धारूर ९, गेवराई ८, केज १६, माजलगाव ६, परळी २, पाटोदा २०, शिरूर २० व वडवणी तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे.
तसेच मागील २४ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये कोल्हेवाडी (ता. केज) येथील ५५ वर्षीय महिला, सोनीजवळा (ता. केज) येथील ६५ वर्षीय महिला व मांडवा (ता. अंबाजोगाई) येथील ९५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९५ हजार ८९३ इतकी झाली आहे. पैकी ९१ हजार ९७४ जण कोरोनामुक्त झाले असून, २ हजार ५८४ जणांचा बळी गेला आहे. सध्या १ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराचे शनिवारी २ रुग्ण वाढले. आता या आजाराचे १९ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २०४ रुग्ण निष्पन्न झाले. यापैकी १३७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.