शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कर्जमाफी योजनेतील एक लाख शेतकर्‍यांचा डाटा जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १७ हजार शेतकर्‍यांची माहिती व बॅँकांची माहिती जुळत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. आता ही माहिती जुळविण्यासाठी बॅँकांना सूचना केल्या आहेत तर संबंधितांना शेतकर्‍यांना आवाहन केले जात आहे.

बीड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १७ हजार शेतकर्‍यांची माहिती व बॅँकांची माहिती जुळत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. आता ही माहिती जुळविण्यासाठी बॅँकांना सूचना केल्या आहेत तर संबंधितांना शेतकर्‍यांना आवाहन केले जात आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत याबाबत तालुकास्तरीय समितीने निर्णय घेऊन जिल्हास्तरावर अहवाल पाठविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. आठ महिने होऊनही अद्याप कर्जमाफीतील माहितीचा घोळ कायम असल्याने मेळ लागत नसल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. कर्जमाफीसाठी शासनाने आॅनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार बॅँकांनीही माहिती सादर केली होती. चार ग्रीन लिस्ट जारी झाल्या. १ लाख ४० हजार पात्र शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीचे ५४५ कोटी २९ लाख रुपये मंजूर  होऊन प्रप्त झाले. जानेवारीपर्यंत १ लाख १३ हजार ६६४ शेतकर्‍यांच्या खात्यावर ४७८ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले आहेत. दरम्यान उर्वरित पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी १ लाख १७ हजार शेतकर्‍यांनी आॅनलाईन अर्जात दिलेली माहिती आणि  बॅँकांनी दिलेली माहिती याचा मेळ लागत नसल्याने या ‘अनमॅच्ड डाटा’ बाबत खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या माहितीची छाननी तालुकास्तरीय समिती करणार आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत हे काम करणयाबाबत सुचविण्यात आले आहे. 

शेतकर्‍यांच्या अनमॅच्ड डाटाबाबत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व जिल्हा सहकारी बॅँकेच्या जवळपास २०० शाखांकडून माहिती मागविण्याचे काम सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका बॅँकेतील किमान दोनशे शेतकर्‍यांचा डाटा जुळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.  मयत शेतकर्‍याच्या वारसदारांची नावे अर्जदार म्हणून येणे, आधार व तत्सम माहिती अपूर्ण असणे, कर्ज खाते क्रमांक व कर्ज रक्कम, थकबाकीचा कालावधी आदी १ ते ६६ कोष्टकातील माहिती जुळत नसल्याची बाब समोर आली आहे. 

अनमॅच्ड डाटा असलेल्यांमध्ये एसबीआयच्या खातेदार शेतकरी अर्जदारांची संख्या जास्त आहे. तर सर्व राष्ट्रीयकृत बॅँकांच्या ७८ हजार व जिल्हा बॅँकेच्या ३८ हजार अशा जवळपास १ लाख १६ हजार शेतकरी अर्जदारांचा समावेश आहे. बॅँकांनी अनमॅच्ड डाटा असलेल्या शेतकर्‍यांची यादी नोटीस बोर्डवर डकविल्या आहेत. 

तालुकास्तरीय समिती घेणार निर्णयअनमॅच्ड डाटाबाबत बॅँक व शेतकर्‍याने सादर केलेल्या माहितीची पडताळणी तसेच अपूर्ण माहितीमुळे पुन्हा देण्यात येणारी माहिती याची खात्री करुन तालुकास्तरीय समिती निर्णय घेणार आहे. या समितीमध्ये उपनिबंधक, सहायक निबंधक, उपलेखा परीक्षक, बॅँक तपासनीसांचा समावेश आहे. 

शेतकर्‍यांनी माहिती द्यावी आॅनलाईन अर्ज केलेल्या संबंधित पात्र शेतकर्‍यांनी अनमॅच्ड डाटामुळे लागणारी माहिती संबंधित बॅँक शाखेशी संपर्क करुन कागदपत्रांसह त्वरित सादर करावी, जेणेकरुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही तसेच ही प्रक्रिया सुलभ होईल. - एस. पी. बडे, जिल्हा उपनिबंधक, बीड.