शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : पांढरी काठी हाती घेऊन घराबाहेर पडून उदरनिर्वाहासाठी काहींना काही करून संसाराचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : पांढरी काठी हाती घेऊन घराबाहेर पडून उदरनिर्वाहासाठी काहींना काही करून संसाराचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या जिल्ह्यातील अंध व्यक्तींसमोर कोरोनामुळे संकटाचा डोंगर उभा राहिला आहे. परिणामी जिल्ह्यातील अंध व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाकडूनही अंध व्यक्तींना कसल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. परिणामी कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यात जवळपास १४०० अंध व्यक्तींची नोंदणी झालेली आहे. अनेक जण उद्योग, व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद अवस्थेत आहेत. परिणामी अंध व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने इतर घटकांना मदत केली. मात्र, अंध व्यक्तींना कोणत्याच प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यातूनही यशस्वी उपचारानंतर अनेक जण बरे झाले आहेत. मात्र, अशा स्थितीत औषधे व उदरनिर्वाह भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

अनेकांवर संकट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अंध व्यक्तींना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. लॉकडाऊन सुरू झाले. व्यवहार ठप्प झाले. परिणामी अंध बांधवांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे.

...

कोरोना काळात मदतीची अपेक्षा

जिल्ह्यात २२ ते २४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील सर्वांनीच कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शासनाने अंध व्यक्तींना भरघोस मदत करावी.

-श्याम सरवदे,

कार्यकर्ता

मानवलोक, अंबाजोगाई

....

आधारही एकमेकांचाच..!!

कोरोनाच्या संकटापूर्वी नियमित काम मिळत होते. त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालत होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून हाताला काम नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तत्काळ मदत करण्याची गरज आहे.

-मुंजाबा शिनगारे

...

काम बंद असल्याने मदत तरी मागायची कोणाकडे? त्यातच हाताला काम नाही. अशा स्थितीत शासनाने विविध घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर अंध व्यक्तींनाही मदत जाहीर करावी. त्यांना मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा.

-भिकाजी कोल्हापुरे

...

मी स्वतः गायक असल्याने गायनाचे कार्यक्रम करायचो. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत होते. गायन क्लासेस घेऊन इतर मुलांनाही गायनाचे धडे देत असे. मात्र, दीड वर्षापासून सर्वच बाबींवर नियंत्रण आले आहे. परिणामी गायनाचे कार्यक्रम झालेले नाहीत. सर्वकाही ठप्प आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-शरद चोपडे

....

अनेक अंध व्यक्ती गायन, संगीत, तबला वादन, विविध वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षण देऊन आपली दैनंदिन उपजीविका भागवीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाबी बंद झाल्याने आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने अंध बांधवांची दखल घेत त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.

...