भाज्यांचे दर कडाडले
बीड : तालुक्यातील काही भागांत झालेला पाऊस तसेच कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून मंडईत भाज्यांची आवक घटली आहे; तर फळभाज्यांची बाहेरच्या जिल्ह्यातून आवक होत आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे भाज्यांच्या दरांवर परिणाम झाला आहे. शेवगा, दोडका १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.
----------
स्वच्छता मोहीम थंडावली
बीड : बारा दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर दोन-तीन दिवस शहरातील काही भागांत गटारींची स्वच्छता करण्यात आली. मात्र त्यानंतर पालिकेची सफाई मोहीम थंडावली आहे. काही ठिकाणी गटारींची सफाई केली जात असली तरी कचरा वाहून नेताना तो ट्रॅक्टरमधून रस्त्यावर सांडतो, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
-------------
कोरोनाचे नियम पायदळी
बीड : शिथिल काळात नागरिक रस्त्यांवर तसेच दुकानांत गर्दी करीत असून कोरोनाचे भान विसरले आहेत. शहरातील कापड दुकान, किराणा दुकान तसेच हॉटेलमध्ये गर्दी होत असून विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नियंत्रणाची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.