शेतातील गहू, ज्वारी, मका, हरभरा या पिकांबरोबर द्राक्षे या फळबागेला फटका बसला आहे. कोरोना आणि अवकाळीने शेतकरी हतबल झाला आहे.
काढणी न केलेल्या उभ्या पिकांचे नुकसान कमी प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभे असलेले रब्बी हंगामातील पिके अजून दोन दिवस हवामान खात्याने अवकाळीचे संकट असल्याचा अंदाज वर्तवल्याने काढू नयेत उघडीप मिळेल, तशी काढणी केलेल्या पिकांची मळणी करून घ्यावी किंवा झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याचा अंदाज दिसल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरीच रहावे.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी
आष्टी
चौकट
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतामध्ये ज्वारी पिकाची काढणी केलेली असून, कणसे व कडबा भिजला. गहू व हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे. - रामा नागरगोज, शेतकरी
===Photopath===
230321\img-20210323-wa0226_14.jpg