जिल्ह्यात रविवारी दोन हजार ९५९ जणांची चाचणी केली गेली. यात दोन हजार ४७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ४८६ जण पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई व बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. अंबाजोगाईत १०७, आष्टीत ५७, बीडमध्ये १२०, धारूरमध्ये ८, गेवराईत ३०, केजमध्ये ३४, माजलगावात ३७, परळीत ४३, पाटोद्यात २६, शिरूरमध्ये १५, वडवणीत ९ असे रुग्ण आढळून आले. तसेच रविवारी आरोग्य विभागाकडे चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये अंबाजोगाई शहरातील केशवनगर भागातील ८२ वर्षीय पुरुष, गेवराई शहरातील ८३ वर्षीय पुरुष, शिरूर तालुक्यातील गोमळवाडा येथील ६५ वर्षीय महिला, बीड शहरातील शिक्षक काॅलनीमधील ७७ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २७ हजार २०० इतकी झाली आहे. तर, २४ हजार ५१६ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ६५९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी दिली.
बापरे! पुन्हा ४८६ नवे रुग्ण अन् चौघांचा बळी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST