शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:35 IST

माजलगाव : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोहरील म्हणातात की तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी हा मुद्देमाल विकला तर अधिकारी म्हणतात हा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोहरील म्हणातात की तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी हा मुद्देमाल विकला तर अधिकारी म्हणतात हा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दोघांच्या बोलण्यात तफावत आल्याने या चोरीचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असले तरी पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरीला जाणे ही सुद्धा एक धक्कादायक बाब आहे.

माजलगाव येथील ग्रामीण पोलीस ठाणे हे शहरातील एका जुन्या इमारतीत कार्यरत होते. त्यावेळी विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल या ठिकाणी ठेवण्यात आला होता. काही महिन्यासंपूर्वी सदर पोलीस ठाण्याचे स्थलांतर केसापूरी कॅम्प भागातील नवीन इमारतीत झाले.

या काळात सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या काळात ठाण्यातील ३ लाख ३२ हजार रूपये किंमतीची ७१ ब्रास वाळू, ५० हजार रूपये किंमतीचा ट्रॅक्टर ट्राली, ५ हजार रूपये किंमतीचे जुने टायर, सीट, ४५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी, ५८ हजार ५९० रुपयाची दारू, चारचाकी गाडीचे ५ हजार रूपयांचे इंजिन,असा ४ लाख ६६ हजार २२२ रूपयांचा मुद्देमाल गायब झाला. सदर मुद्देमाल परिसरात दिसून न आल्याने पोलीस कर्मचारी (मोहरील) आर. डी. सिरसट यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार केली होती.

यावरून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना दिले होते. चौकशीअंती मुद्देमाल गायब असल्याचा अहवाल २० जानेवारी रोजी देऊन संबंधित कर्मचाºयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात पोलीस कर्मचारी (मोहरील) सिरसट यांनी वरील सर्व लाखो रूपयांचा मुद्देमाल तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी काही लोकांशी संगनमत करून विक्री केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती; परंतु संबंधित अधिका-यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असे सिरसट यांचे म्हणणे आहे.

सदर मुद्देमाल तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी विक्री केला असल्याचे सदरील मोहरील सांगत असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.तत्कालीन निरीक्षकांची पाठराखणतत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ठाण्यातील मु्द्देमाल विक्री केल्याची तक्रार देण्यास गेलेल्या मोहरील यांची तक्रार घेतली नाही. उलट हा मुद्देमाल चोरी गेल्याची नोंद केली आहे. विक्री केले काय आणि चोरी गेले काय? शेवटी पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरी जाणे हे पोलिसांसाठी धक्का देणारी बाब आहे. या प्रकरणात वरिष्ठांकडून संजय पवार यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.