शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाचा कळस; बाधितावर नॉनकोविड वॉर्डात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

बीड : विषारी द्रव प्राशन केलेल्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्याच्यावर दोन दिवस नॉनकोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

बीड : विषारी द्रव प्राशन केलेल्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्याच्यावर दोन दिवस नॉनकोविड रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्यावर कोरोनाचे उपचार न झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला रिपोर्टबद्दल प्रशासन किती गाफील आहे, पुन्हा एकदा समोर आले आहे. यानिमित्ताने जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.

बीड तालुक्यातील पारगाव येथील २५ वर्षीय तरुणाने २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता विषारी द्रव प्राशन केले होते. त्यास जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतरित आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल केले. २८ मे रोजी त्याची अँटिजन चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याच दिवशी आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेतला. ३० रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, यंत्रणेच्या गोंधळात तो बाधित असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. दोन दिवस त्याच्यावर विषारी द्रव प्राशन केल्याच्या अनुषंगानेच उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनीच त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या मदत केंद्रातून मिळवला. तो पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालय प्रशासनाने त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता पालिकेमार्फत अंत्यसंस्कार उरकले. मयत तरुणाच्या वडिलांनी जिल्हा रुग्णालय चौकीत जवाब नोंदविला. या प्रकाराने मात्र आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या प्रकरणात नेमके कोण दोषी आहेत, याची माहिती घेत आहे. स्वॅब दिल्यानंतर अलगीकरणात का उपचार केले नाहीत व अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजायला दोन दिवस कसे लागले, याची चौकशी करण्यात येईल. नॉनकोविड वॉर्डमधील इतर रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांचेही स्वॅब घेतले जातील.

डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

--कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर तरुणाला अलगीकरणात का ठेवले नाही, तो पॉझिटिव्ह येऊनही दोन दिवस यंत्रणा गाफील कशी काय राहते? याबाबत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही आरोपी करावे. त्याच्यावर कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ते उपचार न झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे.

राजेंद्र आमटे, नातेवाईक