शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

हरभरा काढणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू अंबाजोगाई : तालुक्यात रब्बी हंगामाचा हरभरा काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मुडेगाव, ...

हरभरा काढणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू

अंबाजोगाई : तालुक्यात रब्बी हंगामाचा हरभरा काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मुडेगाव, ममदापूर पाटोदा, राडी, कुंबेफळ, सातेफळ, अकोला, तडोळा, धानोरा, अंजनपूर, कोपरा व परिसरात हरभरा काढणी सुरू आहे. आठवडाभरापूर्वीच्या पावसात अनेकांचे हरभरे भिजले होते. आता पुन्हा पावसात हरभरे भिजू नये, यासाठी काढणी सुरू आहे.

उघड्या डीपीने धोक्याची शक्यता

अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरीत्या हात पोहोचतील अशा अवस्थेत आहेत. यातील अनेक डीपींचे दरवाजे तुटून वर्षानुवर्षांचा कालावधी लोटला, त्या डीपींना दरवाजे बसले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजीपालावर्गीय पिकांना फटका

अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतातील पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच दररोज असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, याचा मोठा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांना बसू लागला आहे. परिणामी बाजारातही भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत.