शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:56 IST

देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. १९ आॅगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार असल्याने रविवारपासूनच राज्य व परराज्यातून हजारो भाविक दशर्नासाठी परळीत दाखल झाले आहेत.तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची अधिक गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याचे मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. रविवारी ही भाविकांची रीघ होती. दुपारी ही गर्दी वाढत गेली. दिवसभर हर हर महादेवचा जयघोष चालू होता. मंदिर परिसरात प्रसाद साहित्य, खेळणीची दुकाने थाटलेली आहेत. येथे खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून जात आहे. तिसरा श्रावण सोमवार असल्याने शिवमूठ मूग आहे. महिला भाविक मूग अर्पण करतील. मंदिराच्या वतीने महिला- पुरुष व पासधारकांची वेगळी रांग लावण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी असतेच परंतु रविवारी सुटीचा वार असल्याने भक्तांची संख्या वाढली आहे. परंतु याकडे पोलिसांनी लक्ष दिले नाही त्यामुळे मंदिरासमोर वाहतुकीची समस्या उद्भवली होती. रविवारी रात्रीनंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मंदिरासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस निरीक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जगदाळे यांनी तुळजापूरच्या १५ हजार भाविकांना वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोफत येण्या जाण्याची व जेवणाची सुविधा केली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात पाच भक्त निवास असून संत गुरुलिंग स्वामी मंदिर, वक्रेश्वर मंदिर येथेही राहण्याची सोय आहे. या ठिकाणी माफक दर आकारला जातो. तसेच सदाशिव अन्नक्षेत्र असून येथे बाराही महिने बाहेरगावच्या यात्रेंकरुसाठी दोन वेळा मोफत भोजन प्रसाद आहे. सर्व भाविकांसाठी सकाळी खिचडी प्रसाद आहे. शनी मंदिराजवळ अन्नपूर्णा ट्रस्टने श्रावण महिन्यात दोन वेळचे मोफत भोजनाची सोय केली आहे. मंदिरासमोर पार्किंगची सोय आहे. श्रावण सोमवारी तळाजवळ पार्किंगची सोय केली आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम